
हिंदुस्थानात लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी सिनेमागृहे आहेत. हिंदुस्थानातील केवळ 2 टक्के लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतात, असे विधान अभिनेता आमीर खानने नुकतेच केले आहे. देशातील कमी क्रीनबद्दल आमीर खान सातत्याने बोलत आहे. संपूर्ण हिंदुस्थानात जवळपास दहा हजार क्रीन आहेत, तर याउलट अमेरिकेत 40 हजार क्रीन आहेत. चीनमध्ये तर 90 हजार क्रीन आहेत. 10 हजार क्रीनमध्येही अर्ध्या क्रीन या दक्षिणेकडील राज्यात आहेत. त्यामुळे बॉलीवूडच्या वाट्याला केवळ 5 हजार क्रीन येतात.
गेल्या काही वर्षांत सर्वात मोठी हिट ठरलेला चित्रपट, मग तो कोणत्याही भाषेतील असो. चित्रपटगृहात जाऊन पाहणाऱ्यांची संख्या ही 3 कोटी आहे. याचाच अर्थ देशातील लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 2 टक्के आहे. देशात असे काही जिल्हे आणि ठिकाणे आहेत त्या ठिकाणी एकही सिनेमागृह नाही. त्यामुळे देशात अजून थिएटर बनवण्याची आवश्यकता आहे, असे आमीरने म्हटले आहे.