
भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील पाच बँकांना दंड ठोठावला आहे. दंड ठोठावलेल्या बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि आयडीबीआय बँक या पाच प्रमुख बँकांचा समावेश आहे. बँकांमधील सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, नो युवर कस्टमर (केवायसी) नियम आणि क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड – इश्युअन्स अॅण्ड कंडक्टचे पालन न केल्याबद्दल आयसीआयसीआय बँकेला दंड ठोठावण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र आणि आयडीबीआय बँकेने आधार ओटीपी-आधारित ई-केवायसी वापरून उघडलेल्या अनेक ठेव खात्यांबाबत काही नियामक आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला दंड ठोठावण्यात आला आहे.
किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कृषी आणि संबंधित उपक्रमांसाठी अल्पकालीन कर्जांसाठी व्याज अनुदान योजनेवरील नियमांचे पालन न केल्याबद्दल आयडीबीआय बँकेला दंड ठोठावण्यात आला. बँक ऑफ बडोदा बँकेकडून विमा कॉर्पोरेट एजन्सी सेवेत गुंतलेल्या कर्मचाJdयांना कोणतेही प्रोत्साहन (नॉन-कॅश) दिले जात नव्हते. याची खात्री करण्यात बँक अपयशी ठरल्याने आरबीआयने दंड आकारला आहे.
आयसीआयसीआय बँकेला 97.8 लाख रुपये, अॅक्सिस बँकेला 29.6 लाख रुपये, बँक ऑफ महाराष्ट्राला 31.8 लाख रुपये, बँक ऑफ बडोदाला 61.4 लाख रुपये आणि आयडीबीआय बँकेला 31.8 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.