
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार मनिरुल इस्लाम यांनी ही माहिती दिली. सोमवारी जिह्यात पोहोचल्यानंतर त्या मंगळवारी हिंसाचारग्रस्त शमसेरगंज आणि धुलियानला भेट देतील. तसेच बहरामपूरमध्ये पक्षाच्या नेत्यांना भेटून संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा करतील, असे इस्लाम यांनी सांगितले.