
दर रविवारी लोकल ट्रेनच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा सामना करणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना येत्या रविवारी दिलासा मिळणार आहे. 4 मे रोजी वैद्यकीय अभ्यासक्रमाची ‘नीट’ प्रवेश पूर्व परीक्षा असल्यामुळे मध्य रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केला आहे. मेन आणि हार्बर अशा दोन्ही लाईनवर ब्लॉक नसेल. ‘नीट’ परीक्षेला बसणारे विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी ब्लॉक रद्द केल्याचे मध्य रेल्वेने शुक्रवारी जाहीर केले.