हिंदुस्थानशी युद्ध सुरू झाल्यास मी इंग्लंडला पलायन करणार; पाकिस्तानच्या खासदाराची उडाली भीतीनं गाळण

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या आकाशात युद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत. हिंदुस्थानसारख्या बलाढ्य देशाने हल्ला केल्यास पाकिस्तानची धुळधाण उडेल या भीतीने पाकड्यांची आतापासूनच तंतरली आहे. एकीकडे पाकिस्तानच्या पोकळ धमक्या सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तानचे खासदार युद्धाच्या भीतीने देश सोडायच्या तयारीत आहेत. अशातच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफझल खान मारवत यांचे एक विधान चर्चेचा विषय ठरले आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण इंग्लंडला पलायन करू, असे त्यांनी म्हटले आहे.

शेर अफझल खान मारवत हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान-तहरीक-ए-इन्साफ पक्षाशी संबंधीत आहेत. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या बातम्यांनी त्यांची गाळण उडाली आहे. हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाल्यास इंग्लंडला पळून जाण्याची तयारी खासदार शेर अफझल खान मारवत यांनी केली आहे.

हिंदुस्थाननं हल्ला केला किंवा सिंधूचं पाणी रोखलं तर आम्ही अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ; सैरभैर पाकड्यांची पुन्हा दर्पोक्ती

युद्ध सुरू झाले तर आपण काय करणार असे विचारले असता ते म्हणाले की, युद्ध सुरू झाले, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला तर मी इंग्लंडला निघून जाईल. त्यांच्या या विधानावरून पाकिस्तानमधील नागरिक त्यांच्यावर टीका करत आहेत.