
धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर अपघाताची मालिका सुरूच आहे. आज कोस्टल रोडवरून वांद्र्याच्या दिशेने नॉर्थ बॉण्डवर टॅक्सीने खासगी वाहनाला मागून धडक दिली. त्यात बसलेल्या सहांपैकी तिघांना इजा झाली असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या कोस्टल रोडवरून रोज हजारो वाहने ये-जा करत असतात. कोस्टल रोडवर काही जण सुसाट वेगात वाहने चालवतात. अपघाताची माहिती समजताच वरळी पोलिसांनी टोईंग व्हॅनच्या मदतीने त्या गाड्या हटवून पोलीस ठाण्यात आणल्या.