
जागतिक दृश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) आयोजित वेव्हज बझारमध्ये चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन क्षेत्रात आतापर्यंत 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यावसायिक करार झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. हा आकडा एक हजार कोटींवर जाण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला.
हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी सहकार्य करार झाला. त्यानुसार पेट्रिना डी’रोझारियो यांच्या नेतृत्वाखालील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कँटरबरी एनझेड यांनी वेव्हजपासून प्रेरित होऊन न्यूझीलंडमध्ये पहिला हिंदुस्थानी चित्रपट महोत्सव सुरू करण्याचे जाहीर केले. उभय देशांमधील पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सह-निर्मिती संबंध अधिक दृढ करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
प्राइम व्हिडीओ आणि सीजे ईएनएम बहुवार्षिक कराराची घोषणा ही वेव्हज बझारमधील मुख्य आकर्षण होती. या करारात 240 हून अधिक देशांमधील स्ट्रीमिंगचा समावेश आहे. यामध्ये 28 सबटायटल भाषा आणि 11 डब केलेल्या आवृत्त्या असणार आहेत. ‘देवी चौधराणी’, ‘व्हायोलेटेड’ या चित्रपटाच्या लाँचची घोषणाही यावेळी करण्यात आली.
पहलगाम हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अॅलर्ट मोडवर आल्या आहेत, मात्र मुंबईत रेल्वे पोलीस जागे आहेत का, असा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गेल्यावर प्रत्येकाला पडेल. तेथील मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत आहे आणि बंदोबस्तासाठी पोलीसही दिसत नाही. याच ठिकाणी कसाबने हल्ला केला होता हे पोलीस विसरलेत का, असा सवाल प्रवासी करत आहेत.