
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी समाजकल्याण आणि आदिवासी विभागाचा निधी वळवल्याबद्दल मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विचार करतील, असे वक्तव्य करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी हात झटकले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी उद्योजकांशी संवाद, संपूर्ण वन उपक्रमास भेट, सारथीच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
गमतीनं बोललो, शब्द मागे घेतो! मुख्यमंत्रीपदाच्या विधानावरून यू-टर्न
मलाही मुख्यमंत्री बनायचे होते, पण योग जुळून येत नाही, अशा विधानावरून प्रतिक्रिया उमटू लागताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज यू-टर्न घेतला. गमतीने आपण तसं बोललो होतो, शब्द मागे घेतो, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. महाराष्ट्रदिनी आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी हे विधान केले होते. अजितदादांनी मिश्कीलपणे ते विधान केले असले तरी ती त्यांच्या मनामधील खदखदच होती.