
गुजरातमधून आलेल्या युवकाने काळी जादू केल्याचा दावा करत पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरवर घरात घुसून हल्ला केला. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिह्यातील नोएडा येथील रबुपुरा या सीमा राहत असलेल्या गावात तिच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर तेजस झानीला पोलिसांनी अटक केली. तो गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील रहिवासी आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून शनिवारी रात्री 7 वाजता सीमाच्या घरात प्रवेश केला, असे पोलिसांनी सांगितले. सीमा हैदरने आपल्यावर काळी जादू केली असल्याचा दावा त्याने केला.




























































