
अष्टपैलू निलाक्षीका सिल्व्हाने 33 चेंडूंत 56 धावांची निर्णायक खेळी खेळत हिंदुस्थानी महिला संघाविरुद्धच्या लढतीत श्रीलंका महिला संघाला 3 विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. गेल्या सात वर्षांत श्रीलंकेने हिंदुस्थानविरुद्ध मिळवलेला हा पहिला विजय होता. तिरंगी मालिकेतील ही लढत रविवारी झाली.
यजमान संघाचा हा मालिकेतील दुसरा विजय ठरला. या विजयामुळे अंतिम फेरीत प्रवेशाच्या त्यांच्या आशा जिवंत आहेत. मालिकेतील हिंदुस्थानचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. पहिल्या दोन सामन्यांतील विजयामुळे अंतिम फेरीत प्रवेशाची हिंदुस्थानला संधी आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या हिंदुस्थानने यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषच्या 48 चेंडूंतील 58 धावांच्या बळावर 9 विकेट गमावून 275 धावांचे लक्ष्य यजमानांना दिले. 33 षटकांत 4 विकेट गमावून 152 धावा केलेल्या श्रीलंकेच्या संघाने 5 चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठले.