गाझावरील हल्ल्यासाठी इस्रायली मंत्र्यांचे मतदान

गाझा पट्टीमध्ये लष्करी कारवाया तीव्र करायच्या की नाही यावर मत देण्यासाठी इस्त्रायली कॅबिनेट मंत्र्यांची आज बैठक होणार होती. मात्र, या नियोजित बैठकीआधी इस्त्रायलची राजधानी तेल अवीव येथील गुरियन विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याने एकच खळबळ माजली. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांची बैठक पुढे ढकलण्यात आली. हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून लष्कराने हजारो राखीव सैनिकांना बोलावण्यास सुरुवात केली आहे. येमेनमधील इराण समर्थित बंडखोरांनी रविवारी डागलेल्या एका क्षेपणास्त्रामुळे इस्त्रायलच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे आणि प्रवाशांची वाहतूक काही काळासाठी थांबली.