चारधाम यात्रेसाठी नवी ट्रेन

भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिज्म का@र्पोरेशन (आयआरसीटीसी) ने चारधाम यात्रेसाठी 17 दिवसांच्या एसी पर्यटक ट्रेनची घोषणा केली आहे. ही स्पेशल ट्रेन बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम आणि द्वारकाधीशजवळील स्टेशनवरून जाईल. या ट्रेनची सुरुवात दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनपासून 27 मे 2025 पासून सुरू होईल. आयआरसीटीच्या ऑफरमध्ये 16 दिवस आणि 17 रात्रीचे पॅकेज मिळणार आहे. या ऑफरसंबंधी सविस्तर माहिती अधिपृत वेबसाईट irctc.co.in वर देण्यात आली आहे.