
बिहार लोकसेवा आयोगाच्या शिक्षक भरतीचा सप्लीमेंटरी रिझल्ट जारी करण्याच्या मागणीसाठी आज उमेदवारांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. महिला उमेदवारांचाही यावेळी विचार करण्यात आला नाही. अनेक उमेदवार जखमी झाले. अनेक महिला उमेदवार चक्कर येऊन पडल्या. बिहार सरकार नाही लाठीमार सरकार असा आरोप या घटनेनंतर काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी केला. विरोधकांकडून बिहार सरकारच्या या कृतीचा तीव्र निषेध करण्यात येत असून शिक्षक भरतीचे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.