
हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला हादरवून टाकलं आहे. यावरच आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संसदेला संबोधित करताना शरीफ म्हटलं आहे की, “हिंदुस्थानच्या 80 लढाऊ पाकिस्तानच्या सीमेजवळ हल्ला केला. हा हल्ला ज्या पद्धतीने करण्यात आला ते लक्षात ठेवण्यात येईल.”
शाहबाज शरीफ म्हणाले की, त्यांना हल्ल्याची पूर्व माहिती मिळाली होती. त्यांनी सांगितले की, हल्ल्याच्या रात्री पाकिस्तानी हवाई दल पूर्ण सतर्क होते. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दावा केला की, हिंदुस्थानच्या 80 लढाऊ विमानांनी पीओके, शेखुपुरा, सियालकोट आणि शकरगढ सारख्या भागात सहा वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला.
शरीफ म्हणाले की, “मी आधीही सांगितलं आहे की, पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. पण हिंदुस्थानने आमचे म्हणणे मान्य केले नाही. पहलगाम हल्ल्याचे सत्य बाहेर आणण्यासाठी पाकिस्तानने या प्रकरणाची पूर्ण पारदर्शकतेने चौकशी करण्यासाठी एक आयोग स्थापन करण्याची ऑफर दिली होती.”