पहलगाम हल्ल्याचे फोटो, व्हिडीओ असतील तर आमच्याशी संपर्क साधा, NIA चे जनतेला आवाहन

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत 26 जणांची हत्या केली. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) या हल्ल्याचा तपास करत आहे. दरम्यान NIA ने या हल्ल्याशी संबंधित एक आवाहन जनतेला केले आहे.

” पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती, फोटो किंवा व्हिडीओ असतील तर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडील माहितीमुळे आम्हाला दहशतवाद्यांची ओळख पटवायला तसेच त्यांच्या हल्ल्याच्या पद्धतीची अधिक माहिती मिळू शकेल. कोणतीही महत्त्वाची माहिती आमच्या हातातून सुटली नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही नागरिकांना हे आवाहन केले आहे. ज्या ”, असे NIA ने म्हटले आहे.

NIA ने यासाठी एक 9654958816 व 01124368800 हे दोन नंबर दिले असून त्यावर त्यांची खासगी माहिती व मोबाईल नंबर पाठवण्यास सांगितला आहे. त्याआधारे NIA चे वरिष्ठ अधिकारी त्यांना स्वत: संपर्क साधणार आहेत.