केडीएमसीच्या रुग्णालयातील डॉक्टरसह सहा कर्मचारी निलंबित, रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे महिलेचा मृत्यू

रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरसह सहा कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानंतर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे 5 मे रोजी सविता बिराजदार या महिलेचा रुग्णालयाच्या दारातच तडफडून मृत्यू झाला होता. त्यानंतर शिवसेनेने दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.