Operation Sindoor नंतर सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; कुपवाडामध्ये गोळीबार, नागरी भागांना केलं लक्ष्य

हिंदुस्थानने पीओके आणि पाकिस्तानमध्ये घुसून राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान चेकाळला असून नियंत्रण रेषेजवळील नागरी भागांना लक्ष्य करत आहे. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधींचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागामध्ये छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला, तसेच तोफगोळेही डागले. पाकिस्तानच्या या गोळीबाराला हिंदुस्थानी लष्करानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले.

Operation Sindoor पाकिस्तानला घरात घुसून मारले, दहशतवादी तळांवर एअरस्ट्राइक; नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त… 100 अतिरेक्यांचा खात्मा

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा जिल्ह्यातील करनाह परिसरातील नागरी भागांना लक्ष्य करत गोळीबार केला आणि तोफगोळे डागले. सुदैवाने पाकड्यांच्या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पाकिस्तानकडून विनाकारण होत असलेल्या या गोळीबाराला हिंदुस्थानी लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे. अद्यापही सीमारेषेवर तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे करनाह भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

तत्पूर्वी मंगळवारी रात्रीही पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या पूंछ आणि तंगधार भागात नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तुफान गोळीबार केला. पाकिस्तानने नागरी भागांना लक्ष्य करत गोळीबार केला आणि तोफगोळे डागले. या हल्ल्यात हिंदुस्थानचे 15 नागरीक ठार झाले तर 43 हून अधिक जखमी झाल्याची माहिती लष्कराने दिली. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे.

Operation Sindoor पाकिस्तानच्या गोळीबारात 15 मृत्यू, चार मुलांसह दोन महिलांचा समावेश