Operation Sindoor चा 100 टक्के अचूक लक्ष्यभेद; मिसाईल हल्ल्यात JeM व LeT चे दहशतवादी तळ उद्ध्वस्त, सॅटेलाईट फोटो आले समोर

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने घेतला. हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पीओके आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मंगळवारी मध्यरात्री हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून ही कारवाई करत लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. हिंदुस्थानने हल्ला चढवलेल्या दहशतवादी तळांचे सॅटेलाईट फोटो आता समोर आले आहेत. हल्ल्याआधी आणि हल्ल्यानंतरची परिस्थिती यातून स्पष्ट होत आहे.

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भाड्यात हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. याचा बदला हिंदुस्थानने मंगळवारी पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवाद्यांनी तळांवर हल्ला करून घेतला. पीओके आणि पाकिस्तानात 100 किलोमीटर आत लक्ष्यभेद करत लश्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहम्मदचे 9 अड्डे उखडून टाकण्यात आले. आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता अवघ्या 25 मिनिटांमध्ये 24 क्षेपणास्त्र डागत 100हून अधिक दहशतवाद्यांचा हिंदुस्थानने खात्मा केला.

Operation Sindoor पाकिस्तानला घरात घुसून मारले, दहशतवादी तळांवर एअरस्ट्राइक; नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त… 100 अतिरेक्यांचा खात्मा

बहावलपूर आणि मुरिदके येथील दहशतवाद्यांच्या तळावरही हिंदुस्थानने क्षेपणास्त्र डागली. आता याचे सॅटेलाईट फोटो समोर आले असून आधी तिथे काय परिस्थिती होती आणि हल्ल्यानंतर काय परिस्थिती आहे याची तुलना केली जात आहे. बहावलपूरमधील जामिया मशि‍दीच्या घुमटावर हिंदुस्थानचे क्षेपणास्त्र पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर मुरीदके येथील लश्कर-ए-तोयबाचा तळही क्षेपणास्त्र हल्ल्यात पूर्णपणे नष्ट झाल्याचे सॅटेलाईट फोटोंद्वारे स्पष्ट होत आहे. याच ठिकाणी कसाबला दहशतवादी हल्ल्याचे ट्रेनिंग देण्यात आले होते.