Operation Sindoor- पाकिस्तानला घरात घुसून मारणारे हे आहे हिंदुस्थानचे शक्तिशाली हवाई दल! आता शत्रू होतील हवेतच नष्ट

हिंदुस्थानी हवाई दल (IAF) हे जगातील चौथे सर्वात शक्तिशाली हवाई दल आहे. त्यांच्याकडे राफेल, सुखोई-30 एमकेआय, मिराज-2000 आणि तेजस सारखी प्रगत लढाऊ विमाने आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये, राफेल विमानांनी SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्रांनी 25 मिनिटांत दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले.

air defence system at lahore has been neutralised

एस-400 ट्रायम्फ क्षेपणास्त्र प्रणाली 380 किमी अंतरापर्यंत शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करू शकते. शिवाय, बराक-8 (70 किमी), आकाश (25 किमी) आणि स्पायडर (15 किमी) सारखी क्षेपणास्त्रे हवाई क्षेत्राला अभेद्य बनवतात. याचा अर्थ असा की, जर शत्रूने कोणत्याही प्रकारची नापाक कृती केली तर तो स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देईल.  दुसरीकडे, शत्रू देश पाकिस्तानकडे फक्त JF-17 आणि जुनी F-16 विमाने आहेत, जी राफेल किंवा S-400 समोर खूपच बुटकी दिसतात. HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली देखील हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्रांना पूर्णपणे थांबवू शकत नाही.

Operation Sindoor- S-400 हिंदुस्थानच्या आकाशातील सर्वात घातक शिकारी! यानेच सीमेवर पाकिस्तानी क्षेपणास्त्रे केली गिळंकृत, वाचा

एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विशेषतः चीन आणि पाकिस्तानला लक्षात ठेवून तैनात करण्यात आली आहे. त्याची रेंज 40 ते 400 किमी दरम्यान आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या भेटीदरम्यान हिंदुस्थान आणि रशियामध्ये या S-400 क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासाठी करार झाला होता. सध्या, हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान जगातील सर्वात शक्तिशाली संरक्षण प्रणाली मानले जाते. हिंदुस्थानने रशियाकडून सुमारे पाच अब्ज डॉलर्समध्ये ते खरेदी करण्याचा करार केला होता आणि हिंदुस्थानने पाच क्षेपणास्त्र खरेदी केले आहेत.