Operation Sindoor- हिंदुस्थानी सैन्याची कमाल, सीमेवर घमासान! 45 मिनिटे आकाशात ‘सूदर्शन’चा थरार; नंतर पाकिस्तानात तांडव

हिंदुस्थानी सैन्याने पहलगामचा बदला घेत केलेले Opretion Sindoor पाकिस्तानच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. पाकिस्तानने गुरुवारी पहाटे ड्रोन हल्ले करून हिंदुस्थानला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण हिंदुस्थानी सैन्याने S400 म्हणजेच सूदर्शनच्या मदतीने हल्ले परतवून लावलेच पण लाहोर, रावळपिंडीमध्ये ड्रोन हल्ले केले. लाहोरची एअर डिफेन्स यंत्रणा पूर्णपणे नष्ट केली. यानंतर पाकिस्तान आणखी बिथरला. त्याचे नाक कापले गेल्यासारखी स्थिती झाली. अखेर पाकिस्तानने रात्री 9 ते 9:30 च्या सुमारास पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला. तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर प्रचंड गोळीबार केला.

45 मिनिटे प्रचंड मोठ्या प्रमाणात हल्ला सुरू होता. ड्रोन द्वारे सतत मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागण्यात येत होती. यात हिंदुस्थानी सैन्याची ठिकाणे, जम्मू विद्यापीठ, श्रीनगर विमानतळ अशा विविध ठिकाणांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. हिंदुस्थानने खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू-कश्मीरमध्ये ब्लॅकआऊट केले. त्यासोबत S400 च्या मदतीने सारे हल्ले आकाशातूनच परतवून लावले. 45 मिनिटे सीमेवर आणि सीमेलगतच्या गावांच्या आकाशात अक्षरश: घमासान सुरू होते. जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थान तिनही राज्यांच्या सीमेलगतच्या भागांना लक्ष्य करण्याचा पूरेपूर प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू होता. हिंदुस्थानच्या सैन्याने प्रचंड धैर्य आणि शौर्य दाखवत पाकिस्तानचे इरादे धूळीस मिळवले. अखेर पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. पण हिंदुस्थानी सैन्याने त्यांना सोडले नाही.

हिंदुस्थानने या हल्ल्यानंतर पलटवार केला. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ला करत लाहोर, इस्लामाबाद, कराची अशा महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केले. पाकिस्तानच्या कराची बंदराकडे हिंदुस्थानच्या नौदलाने देखील मोर्चा वळवला. INS विक्रांतने कराचीवर जबरदस्त हल्ला करत पाकिस्तानची प्रचंड कोंडी केली. भूदल, हवाई दल आणि नौदल अशा तिनही सैन्याने पराक्रम गाजवला. तंत्रज्ञानाच्या मदतीने, मजबूत मनोबल ठेवत पाकिस्तानच्या भूमीवर एक प्रकारचे तांडव करण्यात आले. यामुळे पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदुस्थानने प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे प्रचंड नुकसान केले आहे. हे नुकसान किती मोठे आहे हे सकाळ झाल्यानंतर अंदाज येईल.

दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले

जम्मू-कश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये हिंदुस्थानी लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सने दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले. सेक्टरमध्ये दोन्ही बाजूंमध्ये जोरदार तोफगोळ्यांचा गोळीबार सुरू असल्याची माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

पाकिस्तानी हवाई दलाची विमाने पाडली

Big Breaking Operation Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानची 3 लढाऊ विमाने पाडली, हल्ल्याची योजना अयशस्वी

पठाणकोट सेक्टरमध्ये हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानी हवाई दलाचे एक विमान पाडले आहे. तर अन्य दोन पाकिस्तानी विमाने पाडल्याचे वृत्त आहे.

Operation Sindoor- आयएनएस विक्रांतने पाकिस्तानवर कहर केला, कराची बंदरावर केला हल्ला!