बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा; हिंदुस्थानात दुतावासाचीही मागणी

हिंदुस्थान आणि पाकिस्तान सुरू असलेल्या तणावाचा फायदा बलुच आर्मीने घेतल्याचे दिसत आहे. बलुच आर्मीच्या बंडखोरांकडून पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले सुरू असतानाच आता बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा बलुच लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे. ‘एक्स’वरून त्यांनी याबाबतची घोषणा केली असून संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता देऊन बैठकही घेण्याची विनंतीही केली आहे. हिंदुस्थानकडून दिल्लीत बलुचिस्तानसाठी दुतावासाचीही मागणी करण्यात आली आहे. दहशतवादी पाकिस्तानचा विनाश जवळ आला असल्याने लवकरच एक संभाव्य घोषणा अपेक्षित आहे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित केले असून हिंदुस्थानला दिल्लीतील बलुचिस्तानचे अधिपृत कार्यालय आणि दुतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती करतो, असे बलुच लेखक मीर यार बलोच यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.