
अखेर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने 269 सायनिंग आॅफ असे म्हणून कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. 269 हा विराटच्या कसोटी क्रिकेटमधील कॅपचा नंबर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घालून मला आता 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, असा कधी प्रवास होईल असं वाटलंही नव्हतं. परंतु कसोटी क्रिकेटने माझी परीक्षा घेतली, मला घडवलं आणि आयुष्यभर हे धडे माझ्यासाठी खूप पुरेसे आहेत. खेळातील संयमता आणि लांबलचक दिवस हे कायमच माझ्यासोबत राहतील यात दुमत नाही असे म्हणत कसोटी क्रिकेटला विराट कोहलीने अखेरचा सलाम ठोकला आहे.
View this post on Instagram
कसोटी क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा निर्णय माझ्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. परंतु या एकूण कारकिर्दीमध्ये माझ्याकडे जे काही होते ते सर्व मी दिले आहे. शिवाय या कसोटी क्रिकेटने मला अपेक्षेपेक्षा जास्त परतही दिले आहे.
म्हणूनच इथून जात असताना माझ्या मनात केवळ कृतज्ञता आहे. ही कृतज्ञता खेळासाठी तसेच ज्या खेळाडूंसोबत मी मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि माझ्याप्रवासातील प्रत्येकासाठी मी कृतज्ञ आहे.
मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहतो असं म्हणत कसोटी क्रिकेटमधून विराट कोहलीने अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.