
ऑपरेशन सिंदूर नंतर संपूर्ण हिंदुस्थानातून आपल्या सैन्याच्या शौर्याचे कौतुक होत आहे. नेटकऱ्यांनीही हिंदुस्थानी सैनिकांना पाठिंबा दिला. अशातच सध्या सोशल मीडियावर एका रशियन महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती हिंदुस्थानी सैन्याची ताकद आणि हिंदुस्थानवरील तिच्या प्रेमाचे अतिशय भावनिक पद्धतीने वर्णन करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनीही तिचे कौतुक केले आहे.
व्हायरल व्हिडीओतील महिला सध्या गुरुग्राममधील रहिवाशी असून युलिया असे तिचे नाव आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर तिने हिंदुस्थानी सैन्यासाठी एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये हिंदुस्थानी सैन्याचे कौतुक करत तिने हिंदुस्थानची संस्कृती, येथील लोक आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दलच्या तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. हिंदुस्थानी सैन्य खूप मजबूत आहे. मी कोणत्याही परिस्थितीत हिंदुस्थान सोडणार नाही…’ असेही तिने म्हटले आहे.
युलियाने व्हिडीओच्या सुरूवातीला म्हटले की, हिंदुस्थान पाकिस्तानातील तणावाच्या बातम्या वाचल्यानंतर माझ्या आजीने मला फोन केला, आणि म्हणाली आपल्या देशात, आपल्या घरात परत ये. तेव्हा मी तिला म्हणाले, कोणतं घरं? मी आता देखील माझ्याच घरात आहे. हिंदुस्थानी सैन्य खूप बळकट आहे. ते कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकते. हिंदुस्थानी सैन्याकडे ती ताकद आहे, त्यामुळेच तर आम्ही रात्री शांत झोपू शकतो. ते स्वत: चा जीव धोक्यात घालून सीमेवर लढत आहे. कारण आम्हाला जगता येईल. मी हिंदुस्थानी सैन्याचे खूप आभार मानते. त्यांचे देशाच्या प्रती प्रेम, निष्ठा ही त्यांच्या कामातून दिसून येत आहे. त्यामुळे मी खरच खूप आभारी आहे, असे तिने व्हिडीओमध्ये म्हेटले आहे.
View this post on Instagram
युलियाचा हा व्हिडीओ @pol.explorer या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटले की, ‘भारत माता की जय.’ आपल्या देशाच्या सैन्याला असा सन्मान मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. तर दुसऱ्याने म्हटले, ‘यावरून असे दिसून येते की भारत हा फक्त एक देश नाही तर एक भावना आहे.’ काही लोकांनी लिहिले की युलियासारखी विचारसरणी असलेले परदेशी लोक हिंदुस्थानची खरी प्रतिमा जगासमोर मांडत आहेत.