
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये चार्टर्ड अकाऊंटंटला (सीए) त्याच्या गाडीच्या चालकाने तब्बल 1.5 कोटींचा गंडा घातला. तो गेल्या 10 वर्षांपासून चालक म्हणून काम करायचा. सीएने चालकाकडे 1.5 कोटी रुपयांची बॅग गाडीत ठेवण्यासाठी सांगितले असता चालक ती घेऊन फरार झाला. पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले असून त्याने बॅगेतील मोठी रक्कम मंदिराच्या दानपेटीत टाकल्याचे उघड झाले. राजेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बंगळुरूतील रहिवासी आहे. सीएने 5 मे रोजी राजेशला 1.5 कोटी रुपये असलेली बॅग दिली होती. बँकेत पैसे भरण्यासाठी गेला असता सीएला सर्व प्रकार समजला. आरोपी राजेश 9 मे रोजी गायब झाला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुह्याची कबुली दिली.