एखाद्याच्या प्रगतीच्या आड येणं हे शेजाऱ्यांचं काम नाही; शाहिद आफ्रिदीने पुन्हा बरळला

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला. हिंदुस्थानने पाकड्यांचा सुपडा साफ केला तरी, पाकड्यांच्या कुरापती सुरूच होत्या. पाकिस्तान अक्षरश: भिकेला लागला असताना  नेते आणि काही व्यक्ती सातत्याने हिंदुस्थानविरोधात खोटे दावे करत होते. यादरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिला. काही दिवसांपूर्वीच शाहिदने पाकिस्तानात विजयी यात्रा काढली होती. आता पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीने अर्थहीन विधान केले आहे. त्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

पाकिस्तानी मीडियासोबत संवाद साधताना शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा हिंदुस्थानवर टिप्पणी केली. हिंदुस्थान प्रगती करत आहे. आम्ही हिंदुस्थानच्या प्रगतीवर खुश आहोत. हिंदुस्थान क्रिकेटमध्येही प्रगती करत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. पाकिस्तानही पुढे जात आहे. पण आम्हाला रोखले जात आहे. म्हणून नाहीतर पाकिस्तानेही वेगाने प्रगती केली असती. एखाद्याच्या प्रगतीच्या आड येणं हे शेजाऱ्यांचं काम नाही, असे आफ्रिदी म्हणाला आहे.

शाहिद आफ्रिदीने केलेल्या या वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. यापूर्वीही त्याने पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मागितले होते. तसेच त्याने या हल्ल्यासाठी हिंदुस्थानी लष्कराला जबाबदार धरले होते.

अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत आफ्रिदीचा चुलत भाऊ ठार 

2003 मध्ये हिंदुस्थानच्या सुरक्षा दलांसोबत अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत शाहिद आफ्रिदीचा चुलत भाऊ शाकिब हरकत उल अंसार हा ठार झाला होता. तो दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. बीएसएफला शाकिबकडे सापडलेल्या कागदपत्रांवरुन ही गोष्ट सिद्ध झाली होती. मात्र, शाहिद आफ्रिदीने या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता.

वायफळ बडबड करणाऱ्या शाहिदी आफ्रिदीला हिंदुस्थानचा दणका, केली मोठी कारवाई