वसई महापालिकेचे अधिकारी रेड्डींवर ईडीची धाड, 9 कोटींची रोकड आणि 23.25 कोटींचे हिरेजडित दागिने जप्त

वसई – विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात सक्त वसुली संचलालयाने वसई महानगरपालिकेचे नगररचनाकार वाय.एस. रेड्डीं यांच्याशी संबंधित मुंबई व हैदराबाद येथील 13 ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या. या छाप्यात 9 कोटींची रोकड आणि 23.25 कोटींचे हिरेजडित दागिने जप्त केले आहे. या ठिकाणी ईडीला मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह कागदपत्रेही सापडली आहेत.