
गुजरातमधील वृत्तपत्र गुजरात समाचारचे मालक बाहुबली शाह यांना ईडीने ताब्यात घेतेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाहुबली शाह यांची चौकशी सुरू होती तसेच त्यांच्या कार्यालयांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. कोणत्या प्रकरणात ईडीने त्यांच्यावर करावाई केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बाहुबली शाह हे गुजरात समाचारच्या मालकांपैकी एक आहेत. त्यांचा मोठा भाऊ श्रेयांश शाह हे गुजरात समाचारचे कार्यकारी संपादक आहेत. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर बाहुबली शाह यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांचा संताप
हा फक्त एका वृत्तपत्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नसून संपूर्ण लोकशाहीचा आवाज दाबण्याचा एक कट आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवणाऱ्या वृत्तपत्रांना टाळे लावले जाते तेव्हा समजून दायचे की लोकशाही धोक्यात आहे. बाहुबली शाह यांची अटक ही भितीच्या राजकारणाचा भाग आहे. ही आता मोदी सरकारची ओळख झाली आहे. पण देश ना दांडक्याने चालणार ना भितीने. भारत चालणार तो सत्य आणि संविधानाने, असे राहुल गांधी म्हणाले.