
लोणारच्या प्राचीन दैत्यसुदन मंदिरातील विष्णूदेव सूर्य किरणोत्सव सुरू झाला आहे. चार दिवस हा किरणोत्सव सुरू राहणार आहे. या काळात सूर्यकिरण गाभाऱ्यातील भगवान विष्णूच्या मस्तकापासून पायापर्यंत पडतील. जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठी 9 व्या ते 12 व्या शतकात निर्माण झालेले प्राचीन विष्णू मंदिर आहे. मंदिरात खगोलशास्त्र, वास्तुशास्त्राचा अनोखा संगम जुळून आला आहे. खजुराहो मंदिराच्या शैलीतील हे मंदिर आहे.