
चंद्रपूर जिह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (टीएटीआर) बफर झोनमध्ये रविवारी वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. तळोधी वनक्षेत्रात वाढोना गावातील रहिवासी मारोती शेंडे (64) पहाटेच्या वेळी तेंदूपत्ता गोळा करण्याकरिता गेले असता वाघाच्या हल्ल्यात जखमी झाले. त्यांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर मुल रेंजमध्ये शिवपूर-चेक गावातील रहिवासी ऋषी पेंडोर हेही वाघाने केलेल्या हल्ल्यात ठार झाले.