‘क्राइम मास्टर गोगो’चा डायलॉग वापरण्यास बंदी

1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. यामध्ये आमीर खान, सलमान खान, करिश्मा कपूर, रविना टंडन, शक्ती कपूर, परेश रावल अशी कलाकारांची दमदार फळी होती. या चित्रपटातील गाणी, व्यक्तिरेखा, डायलॉग आजही लोकांच्या तोंडावर आहेत. त्यावर मीम्स, व्हिडीओ कंटेंट तयार केले जातात. मात्र यापुढे चित्रपटातील डायलॉग, कॅरेक्टरचा वापर करता येणार नाही. कारण तसा आदेश दिल्ली हायकोर्टाने नुकताच दिलाय. त्यामुळे यापुढे ‘आईला’, ‘ऊई मां’, ‘क्राईम मास्टर गोगो…’ ‘आँखे निकाल कर गोटीयां खेलता हूं मैं’, ‘तेजा मैं हूं…’ ‘मार्क इधर है’ यांसारखे डायलॉग्ज आणि अमर, प्रेम, तेजा आणि क्राईम मास्टर गोगो यासारख्या व्यक्तिरेखांचा परवानगीशिवाय वापर करता येणार नाही.