
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि बँक ऑफ बडोदा यासह अनेक बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नवे घर खरेदी करायचे असल्यास सर्वात स्वस्त कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये कॅनरा बँक अव्वल स्थानी आहे. भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरात दिवाळीपर्यंत 0.50 टक्के कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ही कपात झाली, तर येत्या काळात व्याजदर आणखी कमी होऊ शकतात. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची पुढील बैठक येत्या 4 ते 6 जूनदरम्यान होणार आहे. या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात आरबीआयने व्याजदरात दोन्ही वेळा 0.25 टक्के कपात केली. याचाच अर्थ व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात झाली आहे. यामुळे विविध बँकांनी कर्जाचे व्याजदरसुद्धा कमी केले आहे.
बँक व्याजदर
कॅनरा बँक 7.80 टक्के
बँक ऑफ महाराष्ट्र 7.85 टक्के
सेंट्रल बँक 7.85 टक्के
युनियन बँक 7.85 टक्के
इंडियन बँक 7.90 टक्के
ओव्हरसीज बँक 7.90 टक्के
बँक ऑफ बडोदा 8.00 टक्के
बँक ऑफ इंडिया 8.00 टक्के
एसबीआय 8.00 टक्के
पंजाब नॅशनल बँक 8.00 टक्के