
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 35 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘असेन मी… नसेन मी’ या नाटकाने बाजी मारली. या नाटकाने 7.5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. ‘वरवरचे वधुवर’ या नाटकाने दुसरा तर ‘उर्मिलायन’ या नाटकाने तिसरा क्रमांक पटकावला.
दादरच्या छत्रपती शिवाजी नाटय़मंदिर येथे अतिशय जल्लोषात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण दहा व्यावसायिक नाटय़प्रयोग सादर करण्यात आले. यात ‘असेन मी…नसेन मी’ या नाटकाने बाजी मारली. याच नाटकाच्या दिग्दर्शनासाठी अमृता सुभाष हिला तर नाटय़ लेखनासाठी संदेश कुलकर्णी यांना गौरविण्यात येणार आहे. ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’च्या प्रकाश योजनेसाठी आणि ‘असेन मी.. नसेन मी’च्या नेपथ्यासाठी प्रदीप मुळ्ये यांना पुरस्कार जाहीर झाला. ‘वरवरचे वधुवर’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून निषाद गोलांबरे यांना गौरविण्यात येईल.
प्र्रशांत दामले, नीना कुलकर्णी सर्वोत्कृष्ट कलाकार
उत्कृष्ट अभिनयासाठी प्रशांत दामले, ऋषिकेश शेलार (शिकायला गेलो एक), आनंद इंगळे (नकळत सारे घडले), सुव्रत जोशी (वरवरचे वधुवर), ओंकार राऊत (थेट तुमच्या घरातून) यांना तर स्त्राr कलाकारांमध्ये नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले (असेन मी…नसेन मी), निहारिका राजदत्त (उर्मिलायन), सखी गोखले (वरवरचे वधुवर), शर्मिला शिंदे (ज्याची त्याची लव्हस्टोरी) यांना रौप्यपदक जाहीर झाले आहे.