
अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारली. त्यांनी आज मंत्रालय विस्तारित इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील दालनात येऊन विभागाचा आढावा घेतला. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भुजबळ यांना मंत्रालय विस्तारित इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील दालन वितरित करण्यात आले आहे. हे दालन पूर्वी धनंजय मुंडे यांना देण्यात आले होते. याशिवाय भुजबळ यांना शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिल येथील सातपुडा बंगला मिळाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या व्यांग कल्याण विभागाचा कार्यभार आता अतुल सावे यांच्याकडे देण्यात आला आहे. सावे यांच्याकडे सध्या इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण, दुग्धविकास, नवीनीकरणीय ऊर्जा आदी विभागांचा कार्यभार आहे. दिव्यांग कल्याण विभागाबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केली.