जर्मनीच्या हॅमबर्ग सेंट्रल रेल्वे स्थानकात चाकू हल्ला, 12 जण जखमी

जर्मनीतील हॅमबर्ग सेंट्रल रेल्वे स्थानकात शुक्रवारी संध्याकाळी एका हल्लेखोराने अनेक लोकांवर चाकूहल्ला केल्याची घटना घडली. या चाकू हल्ल्यात किमान 12 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे. तसेच परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जर्मन वृत्तपत्र बिल्डने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळी हॅमबर्ग रेल्वे स्थानकात चाकूहल्ला झाला आणि यामध्ये 12 जण जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी शोध घेतला. यावेळी त्यांनी एका 39 वर्षीय महिला संशयिताला अटक केली आहे. हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.