
पेट्रोल, डिझेलच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी राज्यभरातील ईव्ही वाहनांना राज्य सरकारने टोलमाफी जाहीर केली होती. त्याचा जीआर नुकताच काढण्यात आला. त्यामुळे आता टोलनाक्यांसह मुंबईत अटल सेतू उड्डाणपूल आणि समृद्धी महामार्गावरही ईव्ही वाहनांकडून कोणताही टोल वसूल केला जाणार नाही.
राज्य सरकारने विद्युत वाहनांच्या (ईव्ही) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण आणले आहे. मंत्रिमंडळाच्या 29 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली होती; परंतु याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला नव्हता. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. यामुळे मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा-शेवा सेतूवरही ईव्ही वाहनांना पूर्णपणे पथकर माफ करण्यात आलेला आहे.
माफ करण्यात येणाऱ्या पथकर माफीची रक्कम अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे परिवहन विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या उर्वरित राज्य मार्गावर ईव्ही वाहनांना टप्प्याटप्प्याने पथकर माफी देण्याचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती घेणार आहे.
राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात तसेच महत्त्वाच्या महामार्गावर ईव्ही वाहने सहज उपलब्ध होण्यासाठी संपूर्ण राज्यात ईव्हीच्या चार्ंजगचे जाळे विकसित केले जाणार आहे.
z राज्यभरात ईव्ही वाहनांसाठी चार्ंजग स्थानके उभी करण्यात येणार आहेत. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येकी 25 किमी अंतरावर चार्ंजग स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे.
z विद्युत वाहनांच्या खरेदीवर राज्य सरकार प्रोत्साहन रक्कम देणार आहे. ही रक्कम राज्य सरकारकडून वाहन उत्पादक कंपन्यांना दिली जाईल आणि वाहन खरेदीवर तेवढी रक्कम कंपन्या कमी आकारणार आहेत.
z राज्यातील एसटी महामंडळाची सर्व बस स्थानके आणि बस थांब्यावर किमान एक जलद चार्ंजग स्थानक उभारण्यात येणार आहे.