शिवसैनिकांनो मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा, उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबईत मान्सून दाखल झाला आहे आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सोमवारी कामासाठी निघालेला चाकरमानी अनेक ठिकाणी अडकला आहे. त्यामुळे शैवसैनिकांनी मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा असे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच मुंबईकरांची आपल्यालाच काळजी घ्यायची आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या अधिकृत एक्स अकांऊटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की,
पहिल्या पावसामुळे मुंबईत नागरिकांची मोठी गैरसोय होतेय. अशा वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून मुंबईकरांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या मुंबईकरांची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे हिंदमाता परिसरात
दुसरीकडे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे. शिवसेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे हिंदमातामध्ये पोहोचले आहेत तसेच तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.