झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेला माओवादी ठार

प्रातिनिधीक फोटो

झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेला माओवादी ठार झाला आहे. मनिष यादव असे ठार केलेल्या माओवाद्याचे नाव आहे. तर कुंदन खेरनार या माओवाद्याला अटक करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात सोमवारी सकाळी ही घटना घडली.

गुप्त माहितीच्या आधारे रविवारी रात्री उशिरा मौहादंड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दौना येथील जंगलात सुरक्षा दलाने सर्च मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यात मनीष यादव सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. कुंदन खेरवार या माओवादीला अटक केल्याचे पलामूचे उपमहानिरीक्षक वायएस रमेश यांनी सांगितले.

लातेहारमध्ये 10 लाख रुपयांचे बक्षीस असलेला झारखंड जनमुक्ती परिषद (जेजेएमपी) गटाचा प्रमुख पप्पू लोहरा याच्यासह जिल्ह्यात आणखी दोन माओवाद्यांना ठार केल्यानंतर दोनच दिवसांत ही कारवाई करण्यात आली.