
प्रभादेवी येथील प्रभाग क्रमांक 193 मधील वीर सावरकर मार्गावरील लक्ष्मी निवास व कामत हाऊस या सोसायटीची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर विभागप्रमुख-आमदार महेश सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने भिंत बांधून देण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले. यावेळी शाखाप्रमुख संजय भगत, स्वप्निल कीर, आशीष कदम तसेच स्थानिक रहिवाशी प्रमोद सोनी उपस्थित होते.