
बडतर्फ उपनिरीक्षक रणजित कासले याला आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने कासलेला किल्ला कोर्टात हजर केले होते. समाजमाध्यमांवर व्हिडीओ बनवून त्याद्वारे विविध राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक रणजित कासले याला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-3ने अटक केली होती. त्याची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने कासले याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.





























































