
‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे. देशातील प्रमुख ज्योतिर्लिंग व इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने या नव्या सहलीचे आयोजन केले आहे. आयआरसीटीसीच्या पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै 2025 रोजी सोलापूरहून ही अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू होणार आहे.
भारत गौरव रेल्वेगाड्यांमध्ये विना वातानुकूलित शयनयान, तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा, द्वितीय श्रेणी वातानुकूलित डबा असेल. तसेच प्रवासी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेगाडीच्या बाहेरील बाजूस स्मारके, शिल्प, नृत्य प्रकार रेखाटून ती सजवण्यात आली आहे. आयआरसीटीसीच्या प्रत्येक सहलीची आणि दौऱ्याची माहिती, त्याचे तपशील, किंमत आणि आरक्षण प्रक्रियेची सविस्तर माहिती आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासह आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्राचे आरक्षण करता येणार आहे.
विशेष रेल्वेगाडीमध्ये सुमारे 600 ते 700 पर्यटक बसू शकतील, एवढी क्षमता असेल. यासह रेल्वेगाडीत उद्घोषणा, सीसीटीव्ही कॅमेरे, सुसज्ज पेंट्री कार आहे, असे आयआरसीटीसीने सांगितलेय. सहलीची प्रति व्यक्ती किंमत 22,820 रुपयांपासून आहे. तर, 5 ऑगस्ट 2025 रोजी मडगाववरून सुरू होणाऱ्या सहलीसाठी प्रति व्यक्ती 23,880 रुपयांपासून शुल्क सुरू होत आहे. तिकिटाच्या किंमतीत रेल्वेच्या आरक्षित तिकिटासह राहण्याची सोय, जेवण, प्रवेश शुल्क, सहल मार्गदर्शक (टूर गाईड), पर्यटनस्थळी पर्यटकांना ने-आण करण्यासाठी बसची सुविधा, प्रवासी विमा आणि जीएसटी यांचा समावेश आहे.