श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पद्धत

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीने टोकन दर्शनाची रंगीत तालीम घ्यायला सुरुवात केली आहे. याकरिता दररोज 3600 भाविकांना ऑनलाइन पध्दतीने बुकिंग करून त्याचे टोकन मंदिर समितीला दाखवून दर्शनाचा लाभ घेता येत आहे. ही सुविधा निःशुल्क असून यासाठी कोणतेही शुल्क आकरण्यात आले नाही. तसेच या सुविधेमुळे भाविकांना रांगेत जास्त वेळ उभे राहण्याची आवश्यक्ता नाही. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळाला vitthalrukminimandir.org भाविकांनी भेट देऊन टोकन घ्यावे. हे टोकन बुकिंग तारखेच्या दिवशी मंदिर परिसरातील श्री संत तुकाराम भवन येथे पंधरा मिनिटे अगोदर द्यावे. भाविकांनी आपले ओळखपत्र (उदा. आधार कार्ड) दाखवावे. टोकन पासची तपासणी करून घ्यावी. श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. ऑनलाइन टोकन दर्शन सुविधा निःशुल्क आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची मंदिर समिती फी आकारणार नाही. या सुविधांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.