
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आर्थर रोड तुरुंगातील आपल्या अनुभवांवर नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक भाजपच्या 27 आमदारांनी एका बैठकीत संपवलं अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पुस्तक वाचतानाचा एक फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. लपवण्यासारखे काही नाही अशी कॅप्शनही देशपांडे यांनी या फोटोला दिली आहे.
ही पोस्ट रीट्वीट करत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, अरे व्वा!! हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे! आता पर्यंत मला 27 भाजपा आमदारांचे फोन आले; नरकातला स्वर्ग एका बैठकीत वाचून काढले हे सांगण्यासाठी! असेही संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अरे व्वा!!
हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे!
आता पर्यंत मला २७ भाजपा आमदारांचे फ़ोन आले;
नरकातला स्वर्ग एका बैठकीत वाचून काढले हे सांगण्यासाठी! https://t.co/dbOoKe7jGi— Sanjay Raut (@rautsanjay61) June 5, 2025