
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर महामार्गावरील विसापूर गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावर भीषण अपघात झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या डेकोरेशनचे सामान घेवून जात असलेल्या वाहनाने टोल नाक्यावर काम करणाऱ्या युवकावर अक्षरशः गाडीच अंगावरून नेल्याची घटना घडली आहे. युवकाला गंभीर दुखापत झाली. संजय वांढरे असे जखमी युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटना स्थळी पोहचले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.