
इराणमध्ये कुत्र्यांना रस्त्यांवर सोबत घेऊन फिरण्यास बंदी घातली आहे. इराणमधील रमानशाह, इलम, हमादान, करमान, बोरूजेर्ड, रोबत करीम, लवसनात आणि गोलेस्तान या शहरांसह 20 शहरांत ही बंदी घालण्यात आली आहे. कुत्र्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन फिरणे हे आरोग्यासाठी धोकादायक असून कुत्र्यांमुळे सुरक्षेचा मुद्दासुद्धा उपस्थित होत आहे, असे इराणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कुत्र्याला घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जात आहे.