
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगभरात हिंदुस्थानचा ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश घेऊन जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांची भेट घेणार आहेत. शिष्टमंडळांचे प्रतिनिधी मोदी यांच्याशी परदेशातील अनुभव शेअर करणार आहेत. तसेच तेथील सरकारांनी दिलेला प्रतिसाद याबद्दल चर्चाही करण्यात येणार आहे. 50 हून अधिक सदस्य असलेली सात शिष्टमंडळे जगभरातील देशांमध्ये गेली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’चा हेतू आणि पाकिस्तानकडून दहशतवादाला कशाप्रकारे खतपाणी घातले जात आहे याबद्दल शिष्टमंडळांनी विविध देशांच्या सरकारांशी चर्चा केली.