
टेलिकॉम कंपनी एअरटेलने 1.80 लाख लिंकला ब्लॉक केल्याची माहिती दिली. या लिंक ऑनलाईन स्पॅम करण्यासाठी वापरल्या जात होत्या. कर्नाटकात 25 दिवसांत ही कारवाई करण्यात आल्याचे एअरटेलने म्हटले आहे. स्पॅमर्सच्या लिंकला ओळखण्यासाठी एआयची मदत घेतली जात असून या सिस्टममुळे एसएमएस, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टाग्राम, ई-मेल आणि अन्य ब्राऊझरमध्ये लिंकला स्पॅन करण्याचे काम एआयकडून केले जात आहे.