मोदीजी, मी बरा आहे! – शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यावर आज पवार बोलले. ‘मोदीजी, मी बरा आहे. चिंता नसावी. माझी तब्येत ठीक आहे. विचारपूस केल्याबद्दल आभारी आहे’, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मागची भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्यासाठी शिष्टमंडळं पाठवण्यात आली होती. यातील एका शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. मायदेशी परतल्यानंतर या शिष्टमंडळांतील सदस्यांनी मंगळवारी रात्री मोदींची भेट घेतली. यावेळी मोदींनी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलताना शरद पवारांच्या तब्येतीबाबत विचारणा केली होती.