
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडेतोड टीका करणारे टेस्लाचे सीईओ, अब्जाधीश एलन मस्क यांनी अचानक नरमाईची भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना टार्गेट करताना जरा जास्तच बोललो असे मला वाटतेय. ट्रम्प यांच्याबाबत सोशल मीडियात केलेल्या पोस्टसंदर्भात आता मला पश्चात्ताप होतोय, दुःख होतेय, अशी भावना मस्क यांनी बुधवारी व्यक्त केली.
जगात सर्वाधिक धनाढय़ व्यक्ती असलेले एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्या ‘वन बिग ब्यूटीफुल बिला’वर जोरदार टीका केली होती. हे बिल खर्चिक असल्याचा आरोप मस्क यांनी केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी पलटवार करताना मस्क यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दोघांमध्ये सोशल मीडियात आरोपांचे ‘वॉर’ रंगले होते.