
अनेकदा आपण चेहऱ्याच्या सौंदर्याबाबत सजग असतो. परंतु मानेवरील काळेपणाकडे मात्र आपले अजाणतेपणी दुर्लक्ष होते. काळवंडलेली मान ही आपल्याला चारचौघांमध्ये चेष्टेचा विषय ठरते. बऱ्याचदा आपण आपल्या चेहऱ्याच्या तेजाकडे लक्ष देतो. पण मानेचा काळेपणा आपण पूर्णपणे विसरतो. चेहऱ्याचा तेज आपल्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच मानेची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे.
मान काळी का होते?
अधिक काळ सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे मानेवर काळा थर चढतो. त्यामुळे मान काळी होते. तसेच अनेकांमध्ये हार्मोनल बदल झाल्यामुळे, सुद्धा मानेवर काळेपणा येतो.
मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
बेसन, हळद आणि दह्याचा पॅक
बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते, हळद अँटीसेप्टिक आहे आणि दही त्वचेला मॉइश्चरायझ करते. एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि एक चमचा दही मिसळा आणि मानेवर लावा. ते सुकल्यावर ते हलक्या हाताने घासून धुवा. आठवड्यातून दोनदा लावा.
कोरफड जेल आणि लिंबू यांचे मिश्रण
कोरफड त्वचेला थंड करते आणि लिंबू ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. एक चमचा कोरफड जेलमध्ये अर्धा चमचा लिंबू मिसळा. ते मानेवर 15 मिनिटे लावा, नंतर कोमट पाण्याने धुवा.बेकिंग सोडा आणि गुलाबपाणी स्क्रब
बेकिंग सोडा मृत त्वचा काढून टाकतो आणि गुलाबपाणी त्वचा मऊ करते. एक चमचा बेकिंग सोड्यात गुलाबपाण्याचे काही थेंब टाकून पेस्ट बनवा आणि मानेवर हळूवारपणे स्क्रब करा. आठवड्यातून दोनदा ते वापरा.
मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी करा हे साधे सोपे घरगुती उपाय!
महत्वाच्या टिप्स
आंघोळ करताना मानेची स्वच्छता विशेष लक्ष द्या
बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा
हायड्रेटेड रहा आणि निरोगी आहार घ्या