मुरबाडच्या तोंडली गावात दरोडा; सात लाखांचा ऐवज लुटला

बारवी धरणग्रस्त तोंडली गावातील घरावर दरोडा टाकून सात लाखांचे ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री आठ जणांच्या टोळक्याने बळजबरी घरात घुसून कुटुंबीयांना कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकला.

मोतीराम पष्टे हे पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासोबत तोंडली येथील पुनर्वसन वसाहत क्रमांक दोन येथे राहतात. दरोडेखोरांनी त्यांच्या घरात जबरदस्ती प्रवेश केला. त्यांनी कोयता आणि कटावणीचा धाक दाखवत घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल घेऊन पोबारा केला. सुदैवाने या दरोड्यादरम्यान कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे.